2. शिवसेना-भाजपमधील दबावाचं राजकारण शिगेला, शिवसेना खासदार संजय राऊत राज्यपालांना भेटणार, शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचा संजय राऊतांचा दावा
3. मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेल्या शिवसेनेसाठी महसूल आणि अर्थ खातं सोडण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती, तर चर्चा फक्त मुख्यमंत्रिपदावरच होणार, शिवसेना ठाम
4. लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, तर संसार नीट कसा होणार? फेसबुक पोस्टद्वारे रोहित पवारांचा शिवसेना-भाजपला टोला
5. हेक्टरी 25 हजारांची नुकसान भरपाई द्या, सरकारवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंची मागणी, तर शेतकऱ्यांसाठी लगेच सरकार स्थापन होणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
6. दिल्लीत आजपासून ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू, नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना चार हजारांचा दंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रीही नियम पाळणार
7. प्रियांका गांधींच्या व्हॉट्सअॅपमध्ये हेरगिरी, काँग्रेसचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, फोन टॅप होत असल्याचा ममता बॅनर्जींचाही दावा
8. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकणासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याकडून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा
9. रेल्वे प्रशासन आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नातून जेजुरी रेल्वे स्थानकाचा कायापालट, प्रवेश द्वाराजवळ मल्हार गडाची प्रतिकृती
10. पहिल्या ट्वेण्टी 20 सामन्यात बांगलादेशकडून भारताचा 7 विकेट्सनी पराभव, सौम्या सरकार आणि मुशफिकूर रहीमची निर्णायक भागीदारी