देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात पाऊस सुरु, मुंबईत आज हायटाईडचा इशारा, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा


2. राज्यातील महाविद्यालयं 1 ऑगस्टपासून ऑनलाईन सुरु होण्याची शक्यता, मुख्य सचिवाचं सर्व विद्यापीठांना पत्र, ऑनलाईन प्रवेश राबवण्याचे आदेश


3. नीट आणि जेईई परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या; आता सप्टेंबर महिन्यात परीक्षा होणार, तर सीएच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये पार पडणार


4. राज्यात 24 तासात 6364 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 3515 जण कोरोनामुक्त, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्य 1 लाख 92 हजारांच्या पुढे


5. पुणे आणि नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 1 हजार 200 नवे रुग्ण, तर नाशिकमध्ये 189 रुग्णांची नोंद


6. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट, मात्र शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्र्यांच्या विभागासाठी नव्या वाहन खरेदीच्या उधळपट्टीला मंजुरी


7. भाजपच्या राज्य कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना राज्यात स्थान न देता केंद्रात जबाबदारी देणार असल्याची चंद्रकांत पाटील यांची घोषणा; तर खडसे, मेहता, तावडे विशेष निमंत्रित सदस्य


8. डिवचण्याचा प्रयत्न करु नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लेह दौऱ्यानंतर चीनची प्रतिक्रिया, तर घाबरलेल्या पाकिस्तानची तातडीची बैठक


9. 2011 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फिक्सिंग झाल्याचे पुरावे नाहीत, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपांनंतर आयसीसीचं स्पष्टीकरण


10. लालबागचा राजापाठोपाठ यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचीही मूर्ती नाही, पारंपारिक चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मंडळाचा निर्णय