Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 जुलै 2019 | बुधवार
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2019 10:20 AM (IST)
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून 23 जण बेपत्ता, 12 घरं वाहून गेली, एनडीआरएफ घटनास्थळी, शोधकार्य सुरु 2. धरणाच्या दुरावस्थेची तक्रार आधीच केली असल्याचा शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांचा दावा, प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष 3. मुंबईसह कोकणात आजही अतिवृष्टीचा इशारा, पुणे हवामान विभागाची माहिती, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन 4. मध्य रेल्वेवर आज रविवारप्रमाणे लोकलसेवा, सलग तीन दिवसांच्या पावसामुळे मध्य रेल्वेचा निर्णय, अनेक एक्स्प्रेसही रद्द 5. मुंबईत साचलेल्या पाण्यासाठी महापालिकाच जबाबदार, कॅगच्या अहवालात ताशेरे, तर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची अजित पवारांची मागणी 6. नाशिकमध्ये पाण्याची टाकी फुटून 4 मजुरांच्या मृत्यू प्रकरणी 4 जणांना अटक, गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 7. मी पुन्हा येईन... विधानसभेत निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास, अधिवेशनाचे सूप वाजले 8. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी अशोक चव्हाणांऐवजी बाळासाहेब थोरातांची वर्णी, सुत्रांची माहिती, चार कार्यकारी अध्यक्ष नेमणार असल्याचीही चर्चा 9. अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण करणाऱ्या भाजप आमदारावर पंतप्रधान मोदींचा संताप, म्हणाले एक आमदार कमी झाल्याने फरक पडणार नाही 10. टीम इंडियाचा बांगलादेशवर 28 धावांनी दणदणीत विजय, बांगलादेशला हरवून टीम इंडिया विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल