1. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन, शहरं आकर्षक रोषणाईनं उजळली 2. मुंबईत गणेश मंडळांचा मोठा उत्साह, पुण्यातही पारंपारिक पद्धतीने स्वागत होणार, सिद्धीविनायकाच्या मंदिरात भक्तांची गर्दी 3. राजकारण्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी, विवेक ओबेराय, शिल्पा शेट्टींच्या घरी गणरायाचं आगमन 4. आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर, सोलापुरात अमित शाहांच्या भाषणातून संकेत, राणा, महाडिक, गोरेंच्या हाती भाजपचा झेंडा 5. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, इंदापूरमध्ये बुधवारी होणाऱ्या जनसंकल्प मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार 6. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था ढासळली, जीडीपीमध्ये झालेल्या घसरणीवरुन माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांची टीका 7. औरंगाबाद, बीड, उस्मानाबादसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, ओढ्यांना पाणी, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा 8. अखेर पाकिस्तान भारतासमोर झुकला, कुलभूषण जाधवांना आज न्यायालयीन अधिकार देणार, अटी-शर्तींविना कुलभूषण यांना भेटण्याची भारताची मागणी 9. अमरावतीचा शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता, तर नेहा शितोळे या स्पर्धेची उपविजेती, ग्रॅण्ड फिनालेमध्ये स्पर्धकांचे दमदार परफॉर्मन्सेस 10. जमैका कसोटीत पहिल्या डावात वेस्ट इंडीजचा 117 धावांत खुर्दा, भारताला 299 धावांची आघाडी; विंडीजला फॉलोऑन न देण्याचा कर्णधार कोहलीचा निर्णय