देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1.महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ध्वजारोहण, महाराष्ट्राचं वैभव दाखवणारे विविध कार्यक्रम दिवसभर एबीपी माझावर


2. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजारांच्या पुढे, काल दिवसभरात 583 नव्या रूग्णांची वाढ, तर 27 जणांचा मृत्यू

3. जगभरात कोरोनाचा कहर सुरूच, जगातील 212 देशांत पसरला कोरोना, 33 लाखांहून अधिक कोरोना बाधित तर आतापर्यंत 2 लाख 33 हजार लोकांचा मृत्यू

4. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 34 हजारांजवळ, 1 हजार 75 जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त

5. देशात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी वाढला, लॉकडाऊन यशस्वीरित्या पाळल्याने कोरोनाला रोखणं शक्य, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 मे 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. विधानपरिषद निवडणूक पेचप्रसंगावर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, तर 9 जागांची निवडणूक घ्या, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर राज्यरालांचं निवडणूक आयोगाला पत्र

7. राज्यातील विद्यापीठ परीक्षांबाबतचा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसांत, मंत्री उदय सामंत यांची माहिती, यूजीसीच्या विद्यापीठासाठी मार्गदर्शक सूचना

8. लॉकडाऊनमुळे अडकलेले लोक आपापल्या राज्यात परतू शकणार, समन्वयासाठी सरकारकडून 3 अधिकाऱ्यांची नेमणूक, तीर्थयात्री पर्यटकांनाही मोठा दिलासा

9. मालेगावला कोरोनामुक्त करण्यासाठी सरकारचं 'मिशन मालेगाव', 100 आरोग्यसेवकांची टास्क फोर्स नियुक्त, मालेगावमधील रूग्णांची संख्या 258वर

10. पालघर झुंडबळी हत्याकांड प्रकरणी महिन्याभरात अहवाल सादर करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, सुनावणी 22 मेपर्यंत तहकूब