देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच निवडणूक, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांमध्ये धाकधूक तर भाजपमध्ये जोरदार लॉबिंग

2. राफेलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'चौकीदार चोर है' म्हणणाऱ्या राहुल गांधींना पुन्हा नोटीस, 15 फेब्रुवारीला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश

3. शिवसेनेच्या नाराज रवींद्र वायकर यांचं अखेर पुनर्वसन, मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती

4. पक्षात असूनही फोन टॅपिंगची गरज काय? माझाला दिलेल्या मुलाखतीत खडसेंचा भाजपला सवाल, तर मनातलं बंड कायम राहणार असल्याची भावना व्यक्त

5. जळीतकांडातल्या गुन्हेगारांचा हैदराबादसारखा फैसला करा, प्रणिती शिंदेंच्या मागणीला महिला नेत्यांचा दुजोरा, तर विशेष अधिवेशन बोलवण्याची मुनगंटीवारांची मागणी

6. निर्भयाच्या दोषींना तातडीनं फाशी देण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात, तर डेथ वॉरंट जारी करण्याच्या तिहार जेलच्या याचिकेवर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी

7. मुंबईत रेल्वे पुलावर दिवसाढवळ्या तरुणींचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद होऊनही पोलीस तक्रारीच्या प्रतीक्षेत, चोरीप्रकरणी अटकेतील आरोपीला जामीन
8. राममंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी 92 वर्षीय ज्येष्ठ वकील केशवन अय्यंगार पराशरण यांची नेमणूक, पराशरण यांच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कामकाज चालणार

9. जखमी प्रवाशासाठी ट्रेन उलटी चालवली, देवळाली ते भुसावळ शटलच्या मोटरमन आणि गार्डकडून माणुसकीचं दर्शन, सर्व स्तरातून कौतूक

10. कोरोना व्हायरसमुळं तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा तैवान वृत्तसंस्थेचा दावा, चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप, तर, कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचाही मृत्यू