1. देशाच्या राजकीय इतिहासातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपलं, हृदयविकाराच्या झटक्याने माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन, वयाच्या 67व्या वर्षी अखेरचा श्वास

2. सुषमा स्वराज यांचं पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता दिल्लीत अंत्यसंस्कार, पार्थिव सकाळी 11 पर्यंत निवासस्थानी तर 12 ते 3 पर्यंत भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवणार

3. देशाच्या राजकारणातील वैभवशाली अध्याय संपला, सुषमा स्वराज यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, तर उत्तम  मार्गदर्शक गमावल्याची अनेक नेत्यांची भावना

4. कलम 370 मुक्त जम्मू-काश्मीरचं भाजपचं स्वप्न साकार, राज्यसभेनंतर लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचं विधेयक मंजूर, गृहमंत्री अमित शाहांकडून विरोधकांचा समाचार

5. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पोस्टर्स इस्लामाबादमध्ये झळकले, राऊतांच्या बलुचिस्तानबद्दलच्या विधानाचे पाकिस्तानमध्ये पडसाद

6. कोल्हापुरात पावसाने सर्व विक्रम मोडले, बचावकार्यासाठी लष्कर दाखल, तर सांगली, साताऱ्यासह महाडमध्ये महापूर, पुढील 70 तास मुसळधार पावसाचा इशारा

7. राज्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांकडून महाजनादेश यात्रा तूर्तास स्थगित, आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक, सर्व मंत्र्यांना हजर राहण्याच्या सूचना

8. गोदावरीच्या पाण्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा 40 टक्क्यांवर, औरंगाबादसह 300 खेड्यांचा पाणीप्रश्न मिटणार, बीड, उस्मानाबाद, सोलापूरकरांची प्रतीक्षा कायम

9. राज्यातील साडे चार हजार निवासी डॉक्टर आजपासून संपावर, प्रलंबित मागण्यांसाठी संपाचं हत्यार, आपत्कालीन सुविधाही बंद राहणार

10. वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेण्टी20 मालिका टीम इंडियाने जिंकली, तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विंडीजवर 7 विकेट्सनी मात, विराट कोहली आणि रिषभ पंतची दमदार अर्धशतकं