दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या व्यक्ती बाधित आढळल्याने चिंतेत भर, देशातील रुग्णसंख्या चारवर


2. यंदाची न्यू ईअर पार्टी महागण्याची शक्यता, व्यावसायिक गॅस दरातील वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता


3. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज सूप वाजणार, शरद पवारांच्या उपस्थितीत समारोप तर संमेलनस्थळी गर्दीमुळे कोरोना नियमांचे तीनतेरा 


4. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमाकवच मिळणार, रिलायन्स कंपनी 400 कोटी देण्यास तयार, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट


5. बुलढाण्यात खामगावमध्ये वाघाची दहशत, परिसरात जमावबंदी लागू, वनविभागाकडून आज पुन्हा एकदा शोधमोहीम


काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जमावबंद, संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच अनेक कठोर निर्बंधही लावण्यात आले होते. प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सध्या संपूर्ण राज्यभरातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु, बुलढाण्यातील खामगावमध्ये पुन्हा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचं कारण कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा हिंसाचार वैगरे नसून तर एक वाघ आहे. बुलढाण्यात एका वाघामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 05 डिसेंबर 2021 : रविवार : एबीपी माझा



6. चंद्रपूरमध्ये कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, चौघांच्या पायाला फ्रॅक्चर, 15 किरकोळ जखमी


7. ओमायक्रॉन लहान मुलांमध्ये झपाट्यानं वाढू शकतो, महापौर किशोरी पेडणेकरांचं काळजी घेण्याचं आवाहन, मुंबई महापालिकेचा पंचसूत्री अॅक्शन प्लॅन तयार


8. ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, 42  वर्षांचा पत्रकारितेचा प्रवास अखेर थांबला


9. लखनौमध्ये शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, उत्तर प्रदेशात राजकारण तापलं, सपा आणि आपचा योगींवर हल्लाबोल


उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शिक्षक भरतीची मागणी करणाऱ्या बेरोजगारांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. शनिवारी, रात्री बेरोजगार विद्यार्थ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव करण्यासाठी लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आत या मुद्यावरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.


10. वानखेडे कसोटीवर भारतीय संघाची पकड, दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 332 धावांची आघाडी, 10 बळी घेणाऱ्या एजाज पटेल, भारतीय गोलंदाजांनी गाजवला दिवस