दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...


1. नथुरामच्या भूमिकेबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा आळंदीत आत्मक्लेश, महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला अभिवादन करत भूमिकेबाबत दिलगिरी, चित्रपट आज ओटीटीवर प्रदर्शित होणार


2. राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज पुण्यतिथी, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राजघाटावर वाहणार श्रद्धांजली, मोदींचा मन की बात कार्यक्रम सकाळी 11 ऐवजी साडेअकरा वाजता


3. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाची मोठी कारवाई, आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरांना अटक, 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी


4. पेंग्विनच्या मुद्द्यावरुन पुन्हा शिवसेना-भाजप भिडण्याची शक्यता, पेंग्विनच्या खर्चावर भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर किशोरी पेडणेकरांकडून अहमदाबादमधील पेंग्विन प्रकल्पाची पाहणी


5.  अविनाश पाटील यांचे आरोप अंनिस ट्रस्टने फेटाळले, हमीद आणि मुक्ता दाभोलकर ट्रस्टच्या कोणत्याही पदावर नसल्याचं स्पष्टीकरण


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 30 जानेवारी 2022 : रविवार



6. मुंबईत 24 तासांत 1 हजार 411 नवे रुग्ण, तर मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुंबई पालिका आणि राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात आश्वासन


गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पट आहे. मुंबईमधील नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवस सातत्याने कमी होत आहे. सध्या ही संख्या एक ते दीड हजारांमध्ये असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसत आहे. तसेच नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 411 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 12 हजार 187 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. मुंबईत शनिवारी 11 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 602 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 3 हजार 547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्के झाला आहे.  


7. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील वाढतं प्रदुषण रोखण्यात यश, जलपर्णीमुले पाणी पुरवठ्याबरोबरचं नदीतील जलजीवनही आलेलं धोक्यात


8. नवी दिल्लीत 'बीटिंग द रीट्रिट' सोहळा, जवानांचा उत्साह, देशभक्तीचं दर्शन, लेझर शो आणि ड्रोनच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा


9. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची कोरोनावर मात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, प्रकृतीत सुधारणा झाल्यानं आता व्हेंटिलेटरशिवाय उपचार


10. अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताची धडक, बांगलादेशचा पाच विकेट्सनी धुव्वा, भारताकडून अंगरिक्ष रघुवंशीची सर्वाधिक 44 धावांची खेळी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha