Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 जून 2021 बुधवार | ABP Majha


1. राज्यात मंगळवारी 8,085 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 231 जणांचा मृत्यू, राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्क्यांवर


2. पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात आज लसीकरण ठप्प, राज्यात 2 जुलैपर्यंत लसींचा तुटवडा, आरोग्यमंत्री टोपेंची माहिती


3. कोरोनाविरोधातल्या लढाईत भारतीयांना मिळालं चौथं अस्त्र, मॉर्डना कंपनीच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी डीजीसीआयची परवानगी


4. केंद्र सरकारकडून पाम तेलावरच्या आयात शुल्कात कपात, खाद्य तेल स्वस्त होण्याची शक्यता


5. मुंबईकरांच्या खिशाला नव्या कराचा भार, 2014 नंतरच्या इमारतींवर अग्निसुरक्षा शुल्क आकारण्यात येणार


 



6. मुंबई पोलीस दलात आठ वर्ष सेवा बजावलेल्या 727 अधिकाऱ्यांची आता शहराबाहेर बदली, सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस महासंचालकांचा निर्णय


7. मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात लवकरच मराठी भाषेत अभियांत्रिकीचे धडे, अभिनव अशी स्कूल संकल्पनाही राबवण्यात येणार


8. जम्मूतल्या वायुदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचला गेल्याची माहिती, ड्रोन हल्ल्यासाठी आयएसआयनं प्रशिक्षण दिल्याचा संशय


9. इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण, अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ


10. वादळाच्या तडाख्यानंतर जर्मनीचं जनजीवन विस्कळीत, स्टटगर्ट शहर पाण्याखाली, शेकडो घरांचं नुकसान