Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 3 ऑक्टोबर 2021 रविवार | ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

Continues below advertisement

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 3 ऑक्टोबर 2021 रविवार | ABP Majha

Continues below advertisement

1. राज्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट, शनिवारी 2, 696 कोरोनाबाधितांची नोंद तर 49 जणांचा मृत्यू

2. मंत्री अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनी रसद पुरवल्याचा आरोप, ऑडीओ क्लिप्स व्हायरल, कदम यांनी आरोप फेटाळले

3. मुंबई-गोवा क्रूझवर सुरु असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचा छापा, एका बड्या अभिनेत्याच्या मुलासह 10 जणांना अटक

4. संपूर्ण देश वीजटंचाईच्या उंबरठ्यावर, देशभरातल्या 72 वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये फक्त 3 दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक

5. गांधी जयंतीनिमित्ताने काल लेहमध्ये राज्यपालांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे अनावरण

 

6. गांधी जयंतीला महेश मांजरेकरांकडून गोडसे सिनेमाचा टीजर शेअर, जितेंद्र आव्हाडांचा टीजरवर आक्षेप, मांजरेकरांना विचारला परखड सवाल

7. बेळगावातील मराठी भाषिकांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप, केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या प्रश्नावर कर्नाटक सरकारचं मौन

8. ज्येष्ठ विनोदी लेखक, कथाकथनकार द. मा. मिरासदार यांचं निधन, 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

9. कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यानंतर व्याकूळ झालेल्या पत्नीनं लेकीसह गळफास घेत आयुष्य संपवलं, नाशिकमधील धक्कादायक घटना

10. मन सुद्ध तुझं...सकारात्मक विचाराची पेरणी करुन मनाचा गुंता सोडवणारी मालिका आजपासून एबीपी माझाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola