1. राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारल्यानंतर वारकऱ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, संत नामदेव संस्थानाच्या वतीनं याचिका दाखल, सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष


2. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार, आजपासून पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट 


3. महाविद्यालयांचं नवं वर्ष संप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरु होण्याची शक्यता, विद्यापीठाचा शुल्क कमी करण्याचाही निर्णय, मंत्री उदय सामंतांची माहिती 


4. देशभरात गाजणाऱ्या उत्तर प्रदेशातील धर्मांतरण प्रकरणाचं बीड कनेक्शन उजेडात, केंद्रीय बाल कल्याण मंडळात काम करणाऱ्या इरफान शेखला UPATS कडून अटक 


5. ट्विटरनं भारताचा चुकीचा नकाशा हटवला, नकाशात जम्मू-काश्मिर, लडाखचा समावेश नसल्यानं नेटकऱ्यांकडून टीकेची झोड, ट्विटरची माघार


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 जून 2021 | मंगळवार | ABP Majha



6. कोरोना प्रभावित विविध 8 विभागांसाठी 1 लाख 1 कोटी रुपयांची कर्ज हमी योजना, आरोग्यासाठी 50 हजार कोटी, इतर विभागांना 60 हजार कोटींची घोषणा 


7. मुंबईतील 50 टक्के मुलांना कोरोना होऊन गेला, 50 टक्के लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज, मुंबई महानगरपालिकेच्या सिरो सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर 


8. पाच-पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना लसीचे तीन डोस दिल्याचा ठाण्यातील महिलेचा आरोप, प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमणार, महापौरांकडून कारवाईचं आश्वासन 


9. जागतिक नेमबाजी स्पर्धेत राही सरनोबतची सुवर्ण कामगिरी, 25 मीटर पिस्तल प्रकारात कोल्हापूरच्या कन्येची सुवर्ण पदकाला गवसणी 


10. युरो चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्वी फेरीत स्वित्झर्लंडचा फ्रांन्सवर धमाकेदार विजय, उपांत्य फेरीत स्पेनशी लढत