1. कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती, द्रासमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर दिल्लीतील वॉर मेमोरियलवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहिदांना श्रद्धांजली वाहणार
2. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा 'एबीपी माझा'कडून गौरव, माधुरी दीक्षित, राधिका आपटे, उषा मंगेशकर, राहुल आवारे आदी मान्यवरांचा सन्मान
3. शरद पवारांचे खंदे समर्थक सचिन अहिरांच्या शिवसेनाप्रवेशामुळे राष्ट्रवादीत भूकंप, मुंबई अध्यक्षपदावरून नवाब मलिक-जयंत पाटलांमध्ये फूट, सूत्रांची माहिती
4. काँग्रेस नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
5. रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून इच्छुक, विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या जिल्हानिहाय मुलाखती सुरु
6. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनंतर शिवसैनिक आक्रमक, छगन भुजबळांच्या विरोधासाठी मुंबईत बॅनरबाजी
7. लोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर, आता राज्यसभेत सरकारची परीक्षा, चर्चेदरम्यान असदुद्दीन ओवेसी आणि पूनम महाजनांमध्ये घमासान
8. नाशिकच्या मांजारपाडा प्रकल्पावरुन राष्ट्रवादीची भाजपवर कुरघोडी, गिरीश महाजनांआधी भुजबळांनी उद्घाटन उरकलं, गुजरातेत वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात
9. आझम खान यांचं लोकसभा अध्यक्ष रमा देवींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, आझम यांच्या वक्तव्यानं सभागृहात गोंधळ
10. द लायन किंग सिनेमाची 10 दिवसांत 4 हजार कोटींची कमाई, एकट्या चीनमध्ये 700 कोटींचा गल्ला, भारतात सिनेमानं पहिल्या आठवड्यात 75 कोटी कमावले