Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 मार्च 2021 गुरुवार | ABP Majha


1. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी, राज्य सरकारचा निर्णय, निवृत्त न्यायमूर्तींचं चौकशी आयोग नेमणार


2. महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपालांची भेट टळली, राज्यपाल 28 मार्चपर्यंत डेहरादूनच्या दौऱ्यावर


3. राज्यात काल तब्बल 31855 नवे रुग्ण, मुंबईतही 5 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद, लॉकडाऊन नाही पण निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा


4. लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीलाच नांदेड, बीड जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन तर परभणीत एक एप्रिलपर्यंत संचारबंदी, औरंगाबादेत 31 मंगल कार्यालयांचा ताबा 


5. भारत आता कोरोना लसीची निर्यात थांबवणार, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर



6. मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर धाडी, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची धडक कारवाई


7. पीएमसी बँक खातेदारांचं मुंबईतील मुख्य शाखेसमोर आंदोलन, पैसे परत मिळवण्यासाठी रात्रीही ठिय्या 


8. महाबळेश्वरमध्ये तुफान गारपीट, मोठ्या प्रमाणावर गारांचा खच, तर रत्नागिरीतही जोरदार पावसाची हजेरी


9. महाराष्ट्रातील व्यक्तीचं हृदय कर्नाटकातील तरुणाला; सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचा संदेश


10. खासदार मोहन डेलकर प्रकरणी सिल्व्हासाचे जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी