देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. महाराष्ट्रात काल दिवसभरातएकूण 23 नवे रुग्ण, राज्यात एकूण 97 कोरोनाग्रस्त, सांगलीत 4 तर साताऱ्यात एका नव्या रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह

2. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 499 वर तर आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध

3. पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह; पुन्हा एकदा टेस्ट करणार, निगेटिव्ह आल्यास घरी सोडणार

4. महाराष्ट्रात संचारबंदीसह सर्व जिल्ह्यांच्या सीमाही बंद, फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार, टॅक्सी आणि रिक्षातील प्रवासावरही निर्बंध

5. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल विक्री बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश, तर नाशिक नगरमध्ये ठराविक वेळेतच इंधन मिळणार

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 मार्च 2020 | मंगळवार | ABP Majha



6. संचारबंदीनंतरही रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पोलिसांचा चोप, पुणे, नाशिक बीडमध्ये अनेकांवर गुन्हा, तर नागपूरमध्ये उठाबशांची शिक्षा

7. कोरोना संशयित रुग्णाचं कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल मधून पलायन, दुबईवरुन आलेल्या 28 वर्षीय संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांची धावाधाव

8. कोरोनासोबत जगावर 2009 पेक्षाही मोठ्या आर्थिक मंदीचं संकट, आयएनएफचा अंदाज, 2021मध्ये मंदी हटण्याची आशा व्यक्त

9. 30 मार्चऐवजी 30 जूनला आर्थिक वर्ष संपणार, करभरणा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत तर जीएसटी भरण्यासाठी 7 एप्रिलपर्यंत मुभा

10. नाट्यमय घडामोडींनंतर मध्यप्रदेशात भाजपचं सरकार स्थापन; शिवराज सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्री, छोट्या कार्यक्रमात शपथविधीसोहळा संपन्न