1. कितीही चौकशा करा, माझं तोंड बंद होणार नाही, राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा, ईडीकडून तब्बल साडे आठ तास चौकशी, कृष्णकुंजवर कार्यकर्त्यांचा जयघोष
2. आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना पाच दिवसांची कोठडी, सीबीआय कोर्टाचा निर्णय, दिवसातून अर्धा तास कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची परवानगी
3. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पाच दिवसांत गुन्हे दाखल करा, मुंबई हायकोर्टाचे ईओडब्ल्यूला आदेश, अजित पवारांसह सर्वपक्षीय बडे नेते अडचणीत
4. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदेंच्या खांद्यावर, काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी निवड
5. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धुळ्यात तर आदेश बांदेकरांचा माऊली संवाद नाशिकमध्ये, आजपासून खासदार सुप्रिया सुळेंचा संवाद दौरा
6. औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीत एमआयएम शिवसेनेसाठी बी टीम ठरल्याची चर्चा, शिवसेनेचे अंबादास दानवे मोठ्या मताधिक्क्याने विजयी
7. चार दिवसाआड पाणी येणाऱ्या औरंगाबादमध्ये पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाणी रस्त्यावर, पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
8. मुंबई महापालिकेची कामं वेळेत पूर्ण झाली नाही, तर अधिकाऱ्यांचा निम्मा पगार आणि कंत्राटदारांच्या वेतनातून 20 टक्के रक्कम कापणार, आयुक्त प्रवीण परदेशी यांचा इशारा
9. विराट कोहलीसह टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज फ्लॉप, अजिंक्य रहाणेचं अर्धशतक, विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या दिवसअखेरीस 6 बाद 203 धावा
10. पुण्यात अवतरली हिंदी, मराठी, भोजपुरी बोलणारी रोबो, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या टेकफेस्टमध्ये रश्मी रोबोचं आकर्षण, रोबोचा विद्यार्थ्यांसोबत संवाद