1. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, दिल्लीत पवारांसोबत अडीच तास खलबतं केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया
2. संजय राठोडांचा राजीनामा घेणारे मुख्यमंत्री अनिल देशमुखांबाबत काय निर्णय घेणार, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा चेंडू पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
3. राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांनंतर शिवसेनेचे अनिल परब भाजपच्या रडारवर, परबचं गृहखातं चालवत असल्याचा फडणवीसांचा आरोप, पुढचा नंबर परबांचा असल्याचं सोमय्यांचं वक्तव्य
4. मनसुख हिरण हत्येचा गुंता सुटल्याचा एटीएसचा दावा, डीआयजी शिवदीप लांडेंची फेसबुक पोस्ट, निलंबित पोलीस विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर अटकेत
5.परमबीर सिंहांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातल्या परिस्थितीवर काँग्रेस हायकमांडचं लक्ष, प्रभारी एच. के पाटलांची थोरात, पटोले आणि चव्हाणांशी चर्चा
6. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या दाव्याबाबत शंका; महत्वाची कागदपत्रे 'एबीपी माझा'च्या हाती
7. महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, काल दिवसभरात ३० हजार कोरोनाबाधितांची भर, आजपासून मुंबई पालिकेच्या मिशन टेस्टिंगला सुरुवात
8. कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी मोदींनी जाहीर केलेल्या पहिल्या जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण, जनतेकडून थाळीनादाची आठवण, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
9. भारत २०० वर्षे अमेरिकेचा गुलाम होता, उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचं अजब वक्तव्य, मुलांना जन्म देण्यावरुनही वादग्रस्त टिपण्णी
10. बंगालसाठी भाजपचा जाहीरनामा; सरकारी नोकरीत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण, तर 5 रुपयांत भोजन