Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 22 एप्रिल 2021 गुरुवार | ABP Majha


1. 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात आज रात्री 8 वाजेपासून अधिक कडक निर्बंध, सरकारीसह खासगी कार्यालयात 15 टक्के उपस्थितीची अट


2. सर्वसामान्यांसाठी लोकलसह मेट्रो प्रवास बंद तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार


3. लग्न समारंभासाठी केवळ दोन तासाची वेळ, तर  25 जणांच्या उपस्थितीची अट, नियम भंग करणाऱ्या लोकांना 50 हजारांचा दंड 


4. राज्यात काल विक्रमी 67,438 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर 568 रुग्णांच्या मृत्यूची नोंद


5. कोरोना लस ठरतेय प्रभावी, लसीकरण झालेल्या केवळ 0.04 टक्के जणांना कोरोनाची बाधा, केंद्राचा अहवाल


 



6. रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन पुन्हा राज्य विरुद्ध केंद्र सरकार वाद, 50 हजाराची गरज असताना केंद्राकडून महाराष्ट्राला फक्त 36 हजार रेमडेसिवीर


7. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचा मृत्यू, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील घटना, नातेवाईकांच्या आक्रोशानं देश गहिवरला


8. डबल म्युटेंटसह कोरोनाच्या सर्व प्रकारांवर कोव्हॅक्सिनची कार्यक्षमता 78 टक्के, ICMRचा अहवाल


9. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 एप्रिलपासून वीज दरवाढ, 300 हून अधिक युनिट्स वापरणाऱ्या ग्राहकांना दरवाढीचा फटका


10. परदेशात बायोलॉजी शिकवणाऱ्या शिक्षकाला मुंबईतील अंधेरीतून बेड्या, ड्रग्ज तस्करी करत असल्याचं निष्पन्न झाल्यानं एनसीबीची कारवाई