1. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईची महापूजा संपन्न, कोरोनाचं संकट दूर व्हावं म्हणून पांडुरंगाला साकडं


2. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, पॉर्न व्हिडीओ रॅकेटप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई


3. ठाण्यातल्या डान्सबारमध्ये सुरु असलेल्या छमछमचा 'एबीपी माझा'कडून पर्दाफाश, 2 एसीपी आणि 2 पोलीस निरीक्षकांची बदली, बारचा परवाना रद्द, गुन्हा दाखल


4. मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट, रात्रभर सुरु असलेल्या संततधारेनंतर सध्या पावसाची उसंत, अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना


5. अकरावीच्या प्रवेशासाठी 21 ऑगस्टला ऐच्छिक सीईटी,  20 जुलैपासून ऑनलाईन अर्ज करता येणार; गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्रासाठी प्रत्येकी 25 गुण


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 जुलै 2021 | मंगळवार | ABP Majha



6. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी एकही जागा नाही, देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडी सरकारवर टीका 


7. पुणे भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा, एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत एक दिवसाची वाढ


8. पेगॅसस स्पायवेअरच्या मार्फत हेरगिरीच्या आरोपावरुन राजकीय रणकंदन, आज सकाळी 10 वाजता विरोधकांची बैठक, तर संध्याकाळी मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक


9. रिचर्ड ब्रँडसन यांच्यानंतर अॅमेझोनचे माजी सीईओ जेफ बेझोस यांच्या अंतराळ सफरीकडे जगाचं लक्ष, 6 जणांच्या चमूसह 11 मिनिट अंतराळात प्रवास करणार


10. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला हरवून वन-डे सिरीज जिंकण्याची भारताला संधी, तर मालिकेतलं आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंका मैदानावर उतरणार