देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये


1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात यूपी, गुजरातमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, लखनौत एकाचा तर अहमदाबादेत दोघांचा मृत्यू, आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

2. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादेत नागरिकत्व कायद्याविरोधात भव्य निदर्शनं, कुठेही अनुचित प्रकार नाही, विद्यार्थी आणि सेलिब्रिटींचा लक्षणीय सहभाग

3. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज कोलकात्यात ममता बॅनर्जींची रॅली, जामियातही विद्यार्थ्यांचं आंदोलन, अफवा टाळण्यासाठी दिल्ली, यूपीत मोबाईल-इंटरनेट सेवा बंद

4. बुलेट ट्रेनपेक्षा जनतेला रिक्षाच परवडते, देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर, सावरकरांच्या मुद्यावरुनही भाजपला प्रतिसवाल

5. कर्जमाफी आणि मंत्रिमंडळ विस्तारावर महाविकास आघाडीची खलबतं, नागपुरात ठाकरे, पवार आणि खरगेंची बैठक, 23 तारखेला विस्तार, अजित पवारांचे संकेत

6. मोर्चेकरी दहा तर सुरक्षेला 35 पोलीस, मटणाच्या हमी भावासाठी खाटीक समाजाचं आंदोलन, नागपूर अधिवेशनात खाटीक समाजाचा लक्षवेधी मोर्चा

7. महिला सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही, सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना शोधून तुरुंगात टाका, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदेश

8. डिजिटल माध्यमांमुळे आज प्रत्येकाला मोठा उद्योगपती होण्याची संधी, एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' कार्यक्रमात माजी खासदार सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन

9. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावाला मंजुरी, सीनेटच्या निर्णयाकडे जगाचं लक्ष, निवडणुकीत युक्रेनची मदत घेतल्याचा ठपका

10. आयपीएल लिलावात पॅट कमिन्सवर कोलकात्याची सर्वाधिक साडेपंधरा कोटींची बोली; मुंबईच्या 18 वर्षांच्या यशस्वी जैस्वालवर राजस्थानची 2 कोटी 40 लाखांची बोली