1. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस, केंद्र सरकारचा निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधानांचे आभार, तरुणांकडूनही निर्णयाचं स्वागत 


2. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक, लॉकडाऊनबाबत चर्चा होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रिमंडळाचीही दिल्लीत खलबतं


3. किराणा मालाची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु राहणार, वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय 


4. रस्तेमार्गानं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी लवकरच नियमावली, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती 


5. ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीहून विशाखापट्टणमच्या दिशेनं रवाना, परिवहन मंत्री अनिल परब यांचा हिरवा कंदील, वाहतूक सुरळीत होण्यासाठी रेल्वेकडून ग्रीन कॉरिडोअर


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 एप्रिल 2021 | मंगळवार | ABP Majha



6. केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटला तीन हजार कोटी, तर भारत बायोटेकला दीड हजार कोटी, लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारची मदत सुत्रांची माहिती 


7. कोरोना संकटात मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी सरसावलं बॉलिवूड, सेलिब्रिटींच्या वॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेत रुजू


8. देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याकडून लस घेतल्याचा फोटो आधी शेअर मग डिलीट, वय 45 वर्षांच्या वर नसतानाही लस कशी घेतली? काँग्रेसकडून टीकेची झोड


9.  रेल्वे रुळावर पडलेल्या चिमुकल्याला पॉईंटमननं जिवाची बाजी लावत वाचवलं, वांगणी रेल्वे स्थानकातील काळजाचा ठोका चुकवणारी घटना, मयुर शेळकेवर कौतुकाचा वर्षाव 


10. मंगळ ग्रहावर उडालं नासाचं हेलिकॉप्टर, सहा वर्षांच्या मेहनतीला यश, ऐतिहासिक घटनेचे नासाकडून थेट प्रक्षेपण