देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये... 


1. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, सोलापूर, मनमाडमध्ये मध्यरात्री शिवजन्मोत्सव साजरा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरीवर जाणार
2. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नोटीसला उत्तर देण्यासाठी इंदोरीकर महाराजांकडे उरले काही तास, महाराजांकडून दिलगिरी व्यक्त, संभाजी भिडेंचा इंदोरीकारांना पाठिंबा जाहीर
3. एल्गारसंदर्भातल्या आढावा बैठकीतली माहिती केंद्राला कुणी दिली, शरद पवारांचा सवाल, अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवरही गंभीर आरोप
4. तब्बल 16 तासानंतरही डोंबिवलीतील आग धुमसतीच, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न, संपूर्ण शहरावर धुराचे ढग
5. देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचर्‍यापासून वीजनिर्मिती, सात वर्षांनंतर स्थायी समितीची प्रस्तावाला मंजुरी, कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही सुटणार

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 फेब्रुवारी | बुधवार | ABP Majha



6. मुंबईतील माझगाव येथील जीएसटी भवनच्या आगीचे पडसाद महापालिकेत उमटले, पायाभूत सुविधा कमी पडत असल्याची प्रशासनाची कबुली
7. गुजरातच्या कांडला बंदरात चीनमधून पाकच्या दिशेनं निघालेलं जहाज पकडलं, क्षेपणास्त्रासाठी वापरली जाणारी सामग्री सापडल्यानं खळबळ, वैज्ञानिकांकडून तपासणी
8. चीनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार ''सी 17 ग्लोबमास्टर'' विमान पाठवणार, चीनमध्ये कोरोना विषाणूचं थैमान
9. परभणीतील पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या, दोषीला फाशीची शिक्षा, गंगाखेड सत्र न्यायालयाचा निर्णय
10. ब्लू व्हेल, कीकी चॅलेंजनंतर आता 'स्कल ब्रेकर चॅलेंज'चा धुमाकूळ, आई-वडिलांसाठी डोकेदुखी, अनेक मुलांना चॅलेंजमुळे गंभीर दुखापत

एबीपी माझा वेब टीम