Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 मे 2021 | सोमवार | ABP Majha


1. तोक्ते चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर, पुढील चार ते सहा तास मुंबई, ठाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज


2. तोक्ते वादळाचा कोकणाला फटका, सिंधुदुर्गातला वीजपुरवठा खंडित, रायगडमध्ये साडेसात हजार नागरिकांचं स्थलांतर, रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस 


3. तोक्ते वादळामुळे कोकण आणि गोव्यात झाडं उन्मळली, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही संततधार


4. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईसह पालघरमध्ये लसीकरण बंद, तर साठा संपल्याने पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण मोहिमेला ब्रेक


5. कोरोना लढाईत केंद्र सरकारला झटका, ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांचा वैज्ञानिक सल्लागार ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा


6. डीआरडीओचं कोरोनावरील 2DG औषध आजपासून रुग्णांना दिलं जाणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती


7. कोविशील्डच्या दुसर्‍या डोससाठी CoWIN पोर्टलमध्ये बदल; आधीची अपॉईंटमेंट वैध राहणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती


8. नाशिकमधल्या बिटको रुग्णालयात कार घुसवणाऱ्या नगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल, रुग्णालयाच्या कारभाराविरोधात संताप झाल्याने कृत्य, राजेंद्र ताजणे यांची कबुली


9. दहावी परीक्षांसदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका, याचिकाकर्त्यांची मागणी


10. काँग्रेस खासदार राजीव सातव यांना आज अखेरचा निरोप, हिंगोलीतील कळमनुरीत अंत्यसंस्कार, काँग्रेसचे बडे नेते उपस्थित राहणार