1. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान, तर महाविकास आघाडीविरोधात भाजप जनआंदोलन छेडणार
2. अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेणार, रामलीला मैदानावर दुपारी 12 वाजता शपथविधी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीकडे लक्ष
3. पक्षाचे काही कार्यकर्ते गद्दार, तेच चुकीच्या बातम्या देतात, लवकरच त्यांची हकालपट्टी करणार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा इशारा
4. मेगाभरतीसाठी महापोर्टलऐवजी खातेनिहाय ऑफलाईन परीक्षा होण्याची शक्यता, एप्रिलपासून प्रक्रिया सुरु होणार, आरक्षणाची पडताळणीही सुरु
5. शेतकऱ्यांनी वीज बिले भरु नयेत आणि महावितरणकडून लुटण्यात आलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावावा, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचं आवाहन
6. नाशिकच्या लासलगावमध्ये महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न? महिलेला उपचारासाठी मुंबईला हलवलं, मुख्यमंत्र्यांकडून आरोपींवर कडक कारवाईचे आदेश
7. शाहीनबाग आंदोलक आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबद्दल संभ्रम, पायी मोर्चा काढत आज आंदोलक अमित शाहांना भेटणार
8. लोकलमधील गुन्हेगारीला चाप बसणार, मध्य रेल्वेकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, गुन्हेगारीसह, गर्दीवर नियंत्रण मिळण्यास होणार मदत
9. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आलिया भट्ट तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रणवीर सिंहला फिल्मफेअर पुरस्कार, 10 पुरस्कार जिंकत सोहळ्यात 'गली बॉय'चा बोलबाला
10. रणजी करंडकाच्या बाद फेरीचं चित्र स्पष्ट; महाराष्ट्र, मुंबई, विदर्भाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात