1. सीएए आणि एनआरसीविरोधात मुंबईत महामोर्चा, तब्बल 65 संघटनांचा सहभाग, महाराष्ट्र विकास आघाडीतील मंत्र्यांसह कलाकार हजेरी लावणार
2. नवी मुंबईत आजपासून भाजपचं राज्य अधिवेशन, आमदार , खासदारांसह 10 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार, नेरुळमध्ये जोरदार तयारी
3. भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवणार, राज्यातील भाजप नेत्यांची अमित शाहांसोबत दोन तास खलबतं
4. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांना राज्यातील मंत्रिपदाचा दर्जा, महाराष्ट्र राज्य संसद सदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
5. मुख्यमंत्री लवकरच सरप्राईज देतील, औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरासंदर्भात चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य, मनसेकडून मुद्दा हायजॅक होत असल्याचं समजताच शिवसेना सरसावली
6. चालकाने अश्लील हावभाव केल्याने आणि रिक्षा दुसऱ्या दिशेने नेल्याने तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली, मुंलुंडमधील धक्कादायक घटना
7. पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू इथे आज मेगाब्लॉक, मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम, तर एक्स्प्रेस, शटल सेवाही उशिराने
8. मुंबई, ठाण्यातल्या बांगलादेशी आणि अफगाणी घुसखोरांचा पर्दाफाश, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 9 जण ताब्यात, अवघ्या 2 हजारात आधार कार्ड बनवल्याची कबुली
9. बीएस-फोर वाहनांची विक्री 31 मार्चनंतर बंद, कार कंपन्यांची मुदत वाढीची मागणी कोर्टाने फेटाळली, एप्रिलपासून फक्त बीएस-6 वाहनांचीच विक्री
10. विदर्भाची पंढरी असलेल्या बुलडाण्यातील शेगावमध्ये भक्तांचा उत्साह, गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त हजारो भाविकांची गर्दी