Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 एप्रिल 2021 | गुरुवार | ABP Majha



  1. राज्यात काल रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरु, आपातकालीन सेवा वगळता दुकानं बंद राहणार; आपातकालीन प्रवासासाठी पासची गरज लागणार नाही


 



  1. गर्दी होत असल्यास स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा बंद कराव्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना; तर संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश


 



  1. कोरोनाच्या संकटात वेगवेगळ्या मागण्यांसाठी शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा


 



  1. राज्यात काल दिवसभरात 58 हजार 952 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर कोरोनाचे 39 हजार 624 रुग्ण बरे होऊन घरी परतले


 



  1. एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार, उस्मानाबादेतील कालची घटना; जागा अपुरी पडल्याने 8 मृतदेहांचा अंत्यविधी लांबणीवर


 



  1. राज्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर मुंबईतील एलटीटी स्थानकाबाहेर परप्रांतीयांची मोठी गर्दी; गावी जाण्यासाठी लोकांची झुंबड


 



  1. साताऱ्यात गारपीट, वाठार परिसरात बर्फाचा खच; वाशिम, बीड, बारामतीत अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक पीकांचं नुकसान


 



  1. सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय, हे कुणा येरा गबाळ्याचं काम नाही; पंढरपूर पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला


 



  1. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल तब्बल 11 तास सीबीआय चौकशी; सीबीआयचं पुढचं पाऊल काय असणार याकडे सर्वांचं लक्ष


 



  1. कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात बळीचा बकरा बनलेलं भारतीय दाम्पत्य दोन वर्षांनी मायदेशी परतलं; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केलेल्या प्रयत्नामुळे निर्दोष सुटका