१. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा, प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी मोठा निर्णय
चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.आपल्या ट्वीटमध्ये गडकरी म्हणाले की, 'आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.'
२. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातून बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे फोटो हटवले, फक्त नारायण राणेंच्या फोटोला स्थान
३. बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, संपकऱ्यांना नियमांची आठवण करुन देत एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा, कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
४. बस चालकाला फीट आल्यानंतर प्रवासी महिलेच्या प्रसंगावधानामुळं अनर्थ टळला, स्वतः स्टेअरिंग सांभाळल्यानं चालकासह प्रवाशांचे वाचले प्राण, पुण्यातल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल
५. सोलापूरच्या बार्शीत पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक, आरोपी विशाल फटे विरोधात तक्रारींचा पाऊस
६. बापासाठी 'धावल्या' जिगरबाज लेकी! पारनेरच्या भगिनींना दत्ता मेघेंकडून मदतीचा हात
७. महाराष्ट्राकडे लसीचा पुरेसा साठा, लसीअभावी लसीकरणात अडचण नाही; केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
८. गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; जहाल नक्षलवाद्याला बेड्या, हत्येसह अनेक गुन्ह्यात सहभाग
९. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव, कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणं महागात पडणार
१०. आफ्रिकेला त्यांच्या भूमीवर हरवण्याची भारताची संधी हुकली, निर्णायक कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live