1. मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याबाबत 8 दिवसांत निर्णय, मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती तर रुग्णांची संख्या वाढल्यास नव्यानं निर्बंध लादण्याचा इशारा


2. पुणे, सांगली, सोलापुरातील निर्बंध आजपासून शिथिल, पुण्यात मॉल, दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा, सांगलीत आता दुकानं 4 पर्यंत खुली राहणार


3. कोरोना रोखण्यासाठी आणखी एक औषध लवकरच बाजारात, अँटिकोव्हिड सिरम या इंजेक्शनच्या मानवी चाचणीस परवानगी, सांगलीच्या शिराळ्यात निर्मिती


4. राज्यात आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार, सह्याद्री वाहिनीवर शिक्षण विभागाचा ज्ञानगंगा उपक्रम, उद्यापासून ऑनलाईन शाळा


5. पालखीसोबत पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांचं लसीकरण करा, नगराध्यक्षांची मागणी, प्राथमिक स्वरुपात वारी साजरी करण्याचाही आग्रह


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 जून 2021 | सोमवार | ABP Majha



6. राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा, सपा आणि आम आदमी पार्टीचा आरोप, चंपत राय यांनी आरोप फेटाळले


7. बिहारच्या राजकारणाला मोठं वळण, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामध्ये उलथापालथ, पाच खासदारांनी सोडली साथ, जेडीयूत प्रवेशाची शक्यता 


8. भूमिगत विहिरीचा स्लॅब कोसळल्यानं कारला जलसमाधी, घाटकोपरमधील घटना कॅमेऱ्यात कैद, तब्बल 12 तासांनी कार काढली बाहेर 


9. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण, सोशल मीडियावरुन कलाकारांची सुशांतला श्रद्धांजली


10. नोवाक जोकोविचनं रचला इतिहास; अंतिम लढतील त्सिटिपासचा पराभव करत जिंकला 19वा ग्रँडस्लॅम किताब