Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 ऑगस्ट 2021 | शनिवार | ABP Majha
1. अकरावीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया, 14 ते 22 ऑगस्ट दरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदत, 27 ऑगस्टला पहिली यादी जाहीर होणार
2. कोविड योद्ध्यांसाठी सिडकोची विशेष गृहनिर्माण योजना, उद्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, 4 हजार 488 सदनिका उपलब्ध
3. परराज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी लशीचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा RTPCR रिपोर्ट बंधनकारक, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
4. सोलापूर शहरातील निर्बंधामध्ये उद्यापासून शिथिलता; सर्व दुकाने, व्यापार, जिम, योगा सेंटर, सलून-स्पाला रात्री 10 पर्यंत परवानगी, तर धार्मिक स्थळं, नाट्यगृह, सिनेमागृह बंदच राहणार
5. कोरोनाविरोधातील लढाईत भारताला आणखी एक अस्त्र मिळणार, भारत बायोटेकच्या नेझल स्प्रे लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी
6. शिवसेनेच्या युवासंवादमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली सुरुच, औरंगाबादेत मोठी गर्दी, अनेकांच्या चेहऱ्यांवरुन मास्कही गायब
7. मागण्या पूर्ण करा अन्यथा सीबीआय-ईडी चौकशी लावू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांना व्हॉट्सअॅपवरून धमकी, नार्वेकरांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8. देशभरातील सिंगल यूज प्लॅस्टिक वापराला 1 जुलै 2022 पासून बंदी , केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मोठा निर्णय
9. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जुन्या वाहनांसंदर्भात स्क्रॅपेज धोरण जाहीर; नवीन वाहनांचं नोंदणी शुल्क, रस्ते करात सूट मिळणार
10. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट, राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरुप, श्रीनगरमध्ये ड्रोनची नजर तर मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी