- लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची गरज, कालच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचा सूर; लवकरच मुख्यमंत्री निर्णय जाहीर करण्याची शक्यता
- राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यावर संतापले, मंजूर कामाची फाईल वित्तविभागाकडे पाठवल्याने जयंत पाटील नाराज
- सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवून, मोफत व्यापक कोविड प्रतिबंधक लसीकरण करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षातील नेत्यांच पत्र
- मुंबईमध्ये बेड मिळवून देणाऱ्या दलालांचा सुळसुळाट, एका बेडसाठी 40 ते 50 हजारांची मागणी; माझाच्या बातमीची मनपा आयुक्तांकडून दखल
- घरोघरी लसीकरण केलं असतं तर अनेक वृद्धांचे जीव वाचले असते, हायकोर्टाने केंद्राला सुनावलं; अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर न्यायमुर्तींनी फोन केल्यामुळे पुणे मनपाची पोलखोल
- मुंबईत ज्येष्ठ नागरिकाचं घरोघरी जाऊन लसीकरण, महापालिका लवकरच वॉर्डनिहाय लसीकरण कँप सुरु करणार
- दिलासादायक! राज्यात कोरोनाचा आलेख उतरतोय, काल दिवसभरात 58 हजार 805 रुग्णांना डिस्चार्ज, तर 46 हजार 781 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
- अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचा अंतिम निर्णय लवकरच; शिक्षण विभागाचा सर्वेक्षण अहवाल शासनाला सुपूर्द
- एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मॅट कोर्टाचा दिलासा; गोंदियात झालेल्या बदलीवर कोर्टाची स्थगिती
- नशा आणणाऱ्या गोळीच्या प्रभावात नागपुरात तीन हत्या, दारु बंद झाल्याने तरुणांकडून नवी नशा; प्रिस्क्रिप्शनशिवाय गोळी विकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार