- लहान मुलांना आजपासून आरोग्य केंद्रांवर पीसीव्ही लस मिळणार, जीवघेण्या न्युमोनियापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं
- दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता, प्रवीण दरेकरांच्या मागणीला मुख्यमंत्री ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद
- मोदी आणि नड्डांशी चर्चेनंतर पंकजा मुंडे आज दिल्लीहून मुंबईला परतणार; तर प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज समर्थक परळीहून वरळीच्या दिशेनं
- प्रभारी एच. के. पाटलांच्या उपस्थित काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांवर पटोलेंनी केलेल्या आरोपावर पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष
- जरंडेश्वरनंतर महाराष्ट्रातील 40 साखर कारखाने ईडीच्या रडारवर, सूत्रांची माहिती, नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा संशय
- कोरोना काळात आदिवासी बांधवांना दिलासा; खावटी अनुदान योजनेचा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ
- रायगड-सिंधुदुर्गला रेड तर रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, मुंबई-ठाण्यातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज, विदर्भ-मराठवाड्यातही पावसाची बॅटिंग
- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं मूळ रुप देण्यासंदर्भात आराखडा आज ठरणार, आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी आज महत्वाची बैठक
- फक्त राम मंदिरच नव्हे तर काशी आणि मथुराचंही मंदिर होतं निशाण्यावर, लखनऊमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान मोठ्या कटाचा पर्दाफाश
- देशभरातली नीट परीक्षा 12 सप्टेंबरला, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा, आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया