2. सांगली, कोल्हापुरातील पुराबाबत विनाकारण चुकीचे मेसेज व्हायरल करु नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन विभागाचं आवाहन
3. कोल्हापुरातील 5 उपकेंद्र सुरु, 19 गावांसह 11 वाड्यांचा वीजपुरवठा दिवसभरात पूर्ववत, आज 7 उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम होणार
4. राज्य मंत्रीमंडळाची आज अखेरची कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता, बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीविषयी चर्चा
5. मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्यांची चाळण, वाहनचालकांचे हाल, तर अनेक एक्स्प्रेस रद्द झाल्याने मुंबई-पुणे एसटीच्या ज्यादा बससेवा
6. गेल्या 18 वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुट्टी, डिस्कव्हरी चॅनेलच्या कार्यक्रमात मोदींचा खुलासा
7. पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डेंनी भारताविरोधात लेख लिहिल्याचा पाक उच्चायुक्तांचा आरोप, शोभा डेंकडून आरोपांचं खंडन, मात्र सोशल मीडियावर ट्रोल
8. 5 सप्टेंबरपासून 100 एमबीपीएस स्पीड देणारी जिओची गिगाफायबर सेवा सुरु, वर्षभराचा प्लॅन घेणाऱ्यांसाठी बंपर ऑफर्स, घराघरात सिनेमाचं होणार स्क्रीनिंग
9. एचआयव्ही एड्सग्रस्त मुलाचे अंत्यसंस्कार गावकऱ्यांनी नाकारले, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
10. डोंबिवलीचा कोपर उड्डाणपूल 28 ऑगस्टपासून बंद होणार, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार