दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो... 


1. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शाळा-कॉलेज बंद करण्यास तज्ज्ञांचाही विरोध


2. कोरोना उपचारात 'मोलनुपिरावीर' औषधाचा समावेश न करण्याचा ICMR निर्णय, तर सेल्फ टेस्टिंग किट संदर्भात लवकरच मुंबई महापालिकेची नियमावली


कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' या औषधाचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना उपचारात 'मोलनुपिरावीर' जास्त फायदेशीर नसल्याचं ICMR ने म्हटलं आहे. ICMR च्या तज्ज्ञांनी सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत मोलनुपिरावीर जास्त फायदेशीर नसल्याचं सांगितलं आहे. 


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या  (Indian Council of Medical Research) नॅशनल टास्क फोर्स ऑन कोरोना व्हायरस (Coronavirus) ने कोरोना व्हायरस संसर्गाच्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलमध्ये अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीरचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


3. गड-किल्ले, अभयारण्य, लेण्यांवर जाण्यासाठी बंदी, मात्र मॉल्स-थिएटर्समध्ये प्रवेश, निर्बंधांमधील विरोधाभासामुळं नागरिकांकडून संताप


4. आमदार प्रताप सरनाईकांच्या इमारतीचा दंड माफ करण्यासाठी प्रस्ताव मांडला जाण्याची चर्चा, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष, मुंबईतील 500 स्वेअर फुटांच्या घराच्या करमाफीला मंजुरी मिळणार


5. भाजपच्या 12 निलंबित आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळण्याची शक्यता, कारवाईवर कडक ताशेरे, पुढील सुनावणी 18 जानेवारीला


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 12 जानेवारी 2022 : बुधवार


6. नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता तरुणाईशी संवाद साधणार, पंतप्रधानांच्या हस्ते होणार राष्ट्रीय युवा महोत्सवाचा शुभारंभ, 11 वैद्यकीय महाविद्यालयांचंही उद्घाटन


7. उत्तर प्रदेशात सत्तांतर होणारच, सपाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय जाहीर करताना शरद पवारांचं भाकीत, तर शिवसेना उत्तर प्रदेशात 50 जागा लढवणार


8. औरंगाबादेत तीन मित्रांच्या मदतीनं डॉक्टरांचा नर्सवर बलात्कार, पोलिसांकडून डॉक्टरला बेड्या, तिघांचा शोध सुरु
 
9.  राजमाता जिजाऊंच्या 324 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य दीपोत्सव, सिंदखेडराजा येथील  राजवाड्यावर आकर्षक रोषणाई, जयंती उत्सवावर कोरोना निर्बंधांचं सावट..


10. केपटाऊन कसोटीत भारतीय फलंदाजी ढासळली, टीम इंडियाचा पहिला डाव 223 धावांत संपुष्टात, कर्णधार विराटची 79 धावांची झुंझार खेळी