देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
१. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईनसंदर्भात केलेलं ट्विट गायब, क्रिप्टोकरन्सी विधेयकाविरोधात षडयंत्र असल्याची चर्चा
२. म्हाडाची या आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती, ऐन रात्री घोषणा केल्यानं विद्यार्थ्यांचा संताप
आव्हाड यांच्या या ट्विटनंतर त्यावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बंद असताना विद्यार्थी आधीच शेकडो रुपये खर्चून नियोजन करून बसले होते. सरकारने प्रत्येक परीक्षार्थीच्या खात्यात नुकसानभरपाई म्हणून 2000 रु. जमा करावेत, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. आरोग्य विभागमध्ये पण तेच म्हाडामध्ये पण तेच. सरकारचा नियोजन शून्य कारभार आहे, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे.
३. म्हाडाचा पेपर लीक करण्याचा प्रयत्न, चौघं ताब्यात, पुणे सायबर पोलिसांची कारवाई
४. मुंबईच्या भाजप कार्यालयासमोर आशिष शेलारांवर आक्षेपार्ह टिपण्णी करणारे बॅनर्स, महापौर आणि शेलारांमधल्या राजकीय वादानं खालची पातळी गाठल्याची चर्चा
५. कोल्हापुरात गव्याला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू, दोघं जखमी, तर नागरिकांनी नसतं धाडस करु नये, वनविभागाचं आवाहन
६. मुस्लिमांनाही शिकायचंय त्यांना आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल
७. महागाईविरोधात काँग्रेसकडून जयपूरमध्ये महारॅलीचं आयोजन, सोनिया गांधींसह प्रियंका आणि राहुल गांधींही रस्त्यावर उतरणार
८. राज्यात शनिवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 807 नवीन कोरोनाबाधित, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के
९. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त राज्यभर कार्यक्रमांचं आयोजन, देशभरातल्या नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
१०. अमेरिकेला चक्रीवादळाचा तडाखा, प्रति तास 320 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळात शंभरहून अधिक जणांचा मृत्यू