Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 जुलै 2021 रविवार | ABP Majha


1. राज्यात काल 8296 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 6026  रुग्ण कोरोनामुक्त तर 179 रुग्णांच्या मृत्यूची नोंद


2. देशभरात कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम, महाराष्ट्रातील 8 जिल्हे चिंताग्रस्त, कोल्हापूर, सातारा, सांगली सर्वात धोकादायक गटात


3. मुंबईतल्या नायर रुग्णालयात 12 ते 18 वर्षांमधील मुलांचं लसीकरण राबवणार, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन उपाययोजनेला सुरुवात


4. इंधन दरवाढीमुळं भाज्या-डाळी, सिमेंट-स्टील महागले, अमूलनंतर आता गोकुळ आणि मदर डेअरीच्या दुधाच्या दरातही वाढ


5. सोबत राहून पाठीत सुरा खुपसला जातोय, लोणावळ्यातल्या मेळाव्यात बोलताना पटोलेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात उघड नाराजी


 



6. प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं समर्थक नाराज, बीडमधल्या भाजपच्या सात तालुकाध्यक्षांसह 25 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


7. कोरोनाचा धोका असतानाच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, नागपुरात 190 रुग्ण सापडले, अस्वच्छतेमुळं धोका वाढल्याचा निष्कर्ष


8. यूपीत दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही, योगी सरकारकडून आजपासून लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू 


9. कोपा अमेरिका स्पर्धेमध्ये अर्जेंटिनाने ब्राझीलला 1-0 ने नमवले, युरो चषकाच्या अंतिम सामन्यात इटली-इंग्लंडशी भिडणार


10. भारतीय वंशाच्या सिरीषा बांदला अवकाशात झेपावणार, व्हर्जिन गॅलेक्टिकच्या मोहिमेत संशोधक म्हणून मोलाची कामगिरी