१. लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावं ही कुटुंबाची इच्छा नाही, पंडीत हृदयनाथ मंगेशकरांची माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया, वाद थांबवण्याचं राजकारण्यांना आवाहन
२. हिजाबच्या समर्थनार्थ नाशिकच्या मालेगावात हजारो महिलांचा मेळावा, आज हिजाब दिन पाळणार तर शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पोशाख नको, उच्च न्यायालयाची सूचना
३. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आज रिक्षा बंदची हाक, रिक्षा चालकांचा अॅप आधारीत दुचाकी टॅक्सीला विरोध
४. एसटी विलिनीकरणाबाबतचा अहवाल अद्याप तयारच नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाकडे मुदत वाढवून देण्याची मागणी, आज सुनावणी होण्याची शक्यता
५. भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर, पालिकेच्या पायऱ्यांवरच भाजप सोमय्यांचा सत्कार करणार, पुन्हा शिवसेना-भाजप संघर्षाची शक्यता
६.TET घोटाळ्यानंतर आरोग्य पेपरफुटी प्रकरणाला वेग; आणखी एका आरोपीला अटक
७. गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि केजरीवालांचा आज झंझावात तर पंतप्रधान मोदींकडून पुन्हा एकदा काँग्रेसमुक्त भारतचा नारा
८.न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांचा राजीनामा; वादग्रस्त निर्णय दिल्याने आल्या होत्या चर्चेत
मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठातील (Nagpur Bench) अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला (Pushpa Ganediwala) यांनी काल गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी पॉक्सो कायद्याबाबत दिलेले दोन निर्णय वादग्रस्त ठरले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते निर्णय अवैध ठरवून मागे घेतले होते. या निर्णयामुळं गनेडीवाला यांना हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमने हा निर्णय घेतला होता. त्यावेळी गनेडीवाला यांच्या नावाची देशभरात चर्चा झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमने त्यांची नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे कॉलेजियमने दुसऱ्यांदा त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय रद्द केला होता. या परिस्थितीत न्यायमूर्ती गनेडीवाला यांनी राजीनामा दिला आहे. 1
गनेडीवाला यांनी दिलेल्या 'स्किन टू स्किन'बाबत निकालाबाबत सर्व स्तरातून तीव्र पडसाद उमटले होते. त्यांच्या निर्णयानंतर मुंबई उच्च न्यायालयातूनच सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या दोन न्यायमूर्तींनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची 13 फेब्रुवारी 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पदावर नेमणूक करण्यात आली होती. त्याआधी साल 2007 मध्ये त्यांची थेट मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर सत्र न्यायालय, नागपूर कौटुंबिक वाद कोर्ट, एमजेएच्या सहसंचालक, नागपूर सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश, मुंबई सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश, रजिस्ट्रार जनरल अशी विविध पदं भूषवली आहेत.
९. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मालिका विजयाचे श्रेय दुसऱ्यानेच लाटले, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचा आरोप, तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्रींवर नाव न घेता निशाणा
१०. भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना आज; इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी