1. सांगली, कोल्हापुरात पूर ओसरण्यास सुरुवात, कृष्णेची पातळी 57 फुटांवर तर पंचगंगेची 52 फुटांवर, आलमट्टी धरणातून मोठा विसर्ग


 

  1. सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ, अन्न-धान्य, स्वच्छ पाणी, औषधांची मोठी गरज


 

  1. किमान दोन दिवस पूरग्रस्त असाल तरच मोफत अन्नधान्य, राज्य सरकारच्या अजब जीआरनंतर संताप




  1. पुरात हातपाय पांढरे पडले तरीही एनडीआएफच्या जवानांकडून युद्ध पातळीवर मदत, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न, वैद्यकीय सेवाही कार्यरत


 

  1. आलमट्टी धरणातून 4 लाख 80 हजार क्यूसेक्स वेगानं विसर्ग, येडीयुरप्पांची मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती, आता पाणी ओसरण्याची आशा


 

  1. राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली, एमपीएससीचा पेपरही पुढे ढकलला


 

  1. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा हंगामी अध्यक्ष आज ठरण्याची शक्यता, गांधी घराण्याबाहेरील नावाची चर्चा, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय


 

  1. श्वसनाच्या त्रासामुळे अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची एम्सची माहिती, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह भेटीला


 

  1. काश्मीर खोऱ्यात आजपासून शाळा सुरु, इंटरनेटवर बंदी कायम, परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा, 370 कलम हटवल्यानंतर चोख बंदोबस्त


 

  1. 66व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, हिंदीमध्ये अंधाधून तर मराठीत भोंगा ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, नाळमधील चैत्या ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार