महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा ( STI main paper) 2019 मुख्य पेपर हा राज्यातील पूररिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. रविवारी 11 ऑगस्टला ही परीक्षा सकाळी 10 वाजता घेण्यात येणार होती. आता ही परीक्षा 24 ऑगस्टला घेण्यात येणार आहे कोल्हापूर, सांगली सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांनीही मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. अखेर त्यांची विनंती मान्य करण्यात आली असून लवकरच नवे हॉलतिकीट संकेतस्थळावर अपलोड केलं जाईल.
कोल्हापूर, सांगली, कराड, पुणे आणि नाशिकमध्ये गेल्या आठवडाभरापासून पूरस्थिती आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे. राज्यातील पूरस्थिती पाहता सरकारने 11 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त भागातील एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली होती.