Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 09 जून 2021 | बुधवार | ABP Majha


1. घरोघरी नाही मात्र, घराजवळ नक्कीच लसीकरण शक्य; मुंबई उच्च न्यायालयात केंद्र सरकारचं प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण


2. खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित, कोविशील्ड 780, कोवॅक्सिन 1410 रुपये आणि स्पुतनिक व्हीसाठी 1145 रुपये शुल्क 


3. कोरोनाची लाट ओसरतेय; राज्यात मंगळवारी 10 हजार 891 रुग्णांची नोंद, 16 हजार रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत 78 दिवसानंतर मृत्यूचा एकेरी आकडा


4. कोरोनातून बरा होऊन घरी आलेल्या तरुणाला त्याच्याच मृत्यूची माहिती त्यालाच फोनवरुन दिली, साताऱ्यातील फलटणमधली धक्कादायक घटना 


5. भिवंडीत नालेसफाईच्या कामाच्या पाहणीसाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये उतरली, सुविधा चव्हाण यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक


6. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या सरी, सायन, मानखुर्द, चेंबूरमध्ये मुसळधार


7. वाढवायचा असेल तर रोजगार वाढवा; बारामतीतील चहावाल्याने दाढी करण्यासाठी पंतप्रधान मोदींना 100 रुपयांची मनी ऑर्डर पाठवली


8. आमावस्येला बंद राहणारे कांदा आणि धान्य लिलाव यापुढे सुरु राहणार, नाशिकमधल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक वर्षांची परंपरा बंद


9. पूर्व लडाखजवळील LAC नजीक चीनचा युद्धाभ्यास, 24 हून अधिक लढाऊ विमानांचा सहभाग, भारतीय सैन्याची करडी नजर


10. लिंबू, काळ्या बाहुल्या आणि करणी करायची आहे अशा व्यक्तींचे फोटो, पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार