1. कोरोनाला रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी, स्विमिंग पूल, जिम, मैदानं, पर्यटनस्थळं पूर्णपणे बंद, दुकानं, मॉल्स थिएटरसाठी नवे निर्बंध
2. राज्यातल्या शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद , सार्वजनिक वाहतुकीसाठीही 2 डोस बंधनकारक, खासगी कार्यालयांना 50 टक्के उपस्थितीचा नियम
3. नियम धुडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यंत्रणांना आदेश, प्रमुख महापालिकांकडून गृहनिर्माण सोसायटींसाठी नियमावली जाहीर
4. राज्यावर पुन्हा अवकाळीचे ढग, उत्तर कोकण, मुंबई, ठाणे, विदर्भावर पावसाचं सावट, अमरावतीत गारपीट तर वर्ध्यात पावसाच्या सरी
राज्यावर कोरोना प्रादुर्भावासोबतच अवकाळीचं संकटही घोंगावतंय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, काल (शनिवारी) राज्यात काही ठिकाणी पहाटेपासूनच हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटे रिमझिम पाऊस झाला. तर अनेक भागांत गारपीट झाली. त्यामुळे शती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 10 जानेवारीदरम्यान राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5. एबीपी माझाच्या बातमीची मंत्री आदित्य ठाकरेंकडून दखल, नाशकातल्या सावरपाड्यात पाण्यासाठी सुरु असलेला जीवघेणा प्रवास थांबवण्यासाठी लोखंडी पूल, आता पाईपलाईनची प्रतीक्षा
पाहा व्हिडीओ : पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 09 जानेवारी 2022 : रविवार
6. आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी देणारा इसम अटकेत, ओसामा खानला मुंबई पोलिसांकडून वांद्रे परिसरातून बेड्या
7. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला, उत्तर प्रदेशात 7, मणिपूरमध्ये 2 तर पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावामुळे चिंतेत भर पडली आहे. देशावर कोरोनाच्या संकटकाळात उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंजाबमध्ये 117 जागांवर एकाच टप्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये विधानसभाच्या 117 जागा आहेत. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 27 मार्च 2022 रोजी संपणार आहे.
8. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो अडीच रुपये तर पीएनजीच्या दरात प्रतियुनिट दीड रुपयांची वाढ, गेल्या वर्षभरात सीएनजी 18 रुपयांनी महागला
9. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सुप्रीम कोर्टात, विनोद पाटील यांच्याकडून पुनर्विचार याचिका, 12 जानेवारीला सुनावणीची शक्यता
10. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी, जनजीवन विस्कळीत, वाहतुकीचा खोळंबा