- राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, रात्री उशिरा झालेल्या बैठकीत सरकारकडून मागण्या मान्य, मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
- पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे मुंबईत दुधाचा तुटवडा, 13 लाख लीटर दुधाची आवक घटली, पुरामुळे कोल्हापुरात टँकर अडकले
- राधानगरीत धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला, 18 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, कोल्हापुरात पाणी वाढण्याची शक्यता
- सांगलीत पावसाचं थैमान सुरुच, निम्मं सांगली पाण्याखाली , येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा, अपुऱ्या मदतीनं लोकांचे हाल
- पूरग्रस्तांना सरकारकडून दिलासा, पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे मिळणाऱ्या भरपाईत वाढ
- शिवस्वराज्य यात्रेवरुन राष्ट्रवादीत दोन गट? शिवनेरीवर फक्त दोनच नेते, उदयनराजेंची दांडी
- भिंतीवर सुसाईड नोट लिहून बारावीच्या विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, बीडच्या अंबाजोगाईमधील घटना
- जम्मू-काश्मीरमधील कलम-370 रद्द केल्यावर पाकिस्तानचा तिळपापड, भारताशी व्यापारी संबंध तोडले, भारतातील उच्चायुक्तांनाही परत बोलावलं
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करण्याची शक्यता, तर अजित डोवाल शोपियानच्या रस्त्यांवर, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, स्थानिकांसोबत जेवणाचा आस्वाद
- सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात, 0.35 टक्क्यांच्या कपातीनंतर नवा दर 5.40 टक्क्यांवर, कर्जावरील EMI स्वस्त होणार