देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये... 


1. सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाचा कायदा रद्द, पंतप्रधानांनी निर्णय घेण्याची हिंमत दाखवावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य


2. महाराष्ट्रातील रुग्णवाढ कमी, मात्र धोका कायम, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करणार असल्याचा दावा 


3. देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून भीती व्यक्त, सातारा आणि सोलापूर जिल्ह्ये धोक्याच्या उंबरठ्यावर 


4. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेचं उत्तम काम, सुप्रीम कोर्टाची पालिकेवर स्तुतिसुमनं, मुंबईकडून शिकण्याचा दिल्ली महानगरपालिकेला सल्ला 


5. मुंबईत लसीकरणाला सोसायट्यांमध्येच परवानगी मिळण्याची शक्यता, खाजगी रुग्णालयांसोबत करार करुन लसीकरण मोहीम राबवता येणार 


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 मे 2021 | गुरुवार | ABP Majha



6. कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्वॅब स्टिक्सचं चक्क घराघरात पॅकिंग, उल्हासनगरमधील धक्कादायक घटना, पालिका प्रशासनासह पोलिसांची धाड 


7. अदर पुनावाला यांना धमकी कोणी दिली? राज्याचे पोलीस महासंचालक, पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश देण्याची मागणी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल 


8. कॅनडात 12 ते 15 वयोगटातील मुलांनाही फायझरची लस देण्यात येणार, वरिष्ठ आरोग्य सल्लागारांची माहिती 


9. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची आजपासून ऑनलाईन परीक्षा, दीड लाखांहून अधिक विद्यार्थी अंतिम सत्राची परीक्षा देणार 


10. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते दिलीप ताहील यांचा मुलागा ध्रुव ताहीलला 35 ग्रॅम ड्रग्जसह अटक, मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई