स्मार्ट बुलेटिन | 06 ऑगस्ट 2019 | मंगळवार | एबीपी माझा


1. कलम 370 रद्द करण्याचे संशोधन विधेयक राज्यसभेत मंजूर, औपचारिक मंजुरीसाठी विधेयक आज लोकसभेत, केंद्र सरकारच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत

2. कलम 370 रद्द करण्याच्या भूमिकेचं शिवसेनेकडून जोरदार स्वागत, तर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती पोलिसांच्या ताब्यात

3. राममंदिर, बाबरी मशिदप्रकरणाची आजपासून सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी, आठवड्यातून तीन दिवस सुनावणी, 100 दिवसात निकाल लागण्याची शक्यता

4. मध्य रेल्वेवरील कर्जत-बदलापूर लोकल सेवा पूर्ववत, तांत्रिक बिघाड आणि रुळांखालील खडी वाहून गेल्याने तीन दिवसांपासून बंद असलेली वाहतूक सुरु

5. खासदर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा, शिवनेरीच्या पायथ्याला सुरुवात, तर रायगडावर यात्रेचा शेवट


6. भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने ईव्हीएममधील दोष सिद्ध करता येत नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचा आरोप

7. विद्यावेतन वाढीच्या मागणीसाठी मार्डचे डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार, 16 वैद्यकीय महाविद्यालयातील 4 हजार 500 डॉक्टर होणार सहभागी

8. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाला मोठी गळती,  दुर्घटनेपूर्वी तात्काळ दुरुस्ती करणं गरजेचं, जलविद्युत केंद्रात पाणी शिरल्यानं 55 गावांची वीज खंडीत

9. फिल्टर प्लान्टमध्ये पाणी शिरल्याने कोल्हापुरात पाणीपुरवठा बंद, पंपिंग मशिन कार्यान्वित झाल्यावरच पुन्हा पाणीपुरवठा, पुणे-बंगळुरु महामार्गावरही पुराचे पाणी

10. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टेनचा निवृत्तीचा निर्णय