Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 एप्रिल 2021 सोमवार | ABP Majha
1. राज्यात कोरोनाची दहशत, दिवसभरात 57 हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, 222 रुग्णांचा मृत्यू
2. मुंबई, पुण्यात कोरोनाची परिस्थिती बिकट, मुंबईत 11 हजार 163 तर पुणे जिल्ह्यात 12 हजार 494 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
3. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज रात्री 8 वाजल्यापासून नव्या निर्बंधांची अंमलबजावणी, 30 एप्रिलपर्यंत शनिवारी-रविवारी पूर्ण लॉकडाऊन
4. पुढील सूचनेपर्यंत मॉल्स, जिम, धार्मिक स्थळं बंद राहणार, मात्र किराणा मालासह जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार
5. लोकल आणि बसमध्ये उभ्यानं प्रवास करण्यास मनाई, रिक्षा-टॅक्सीमध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना मुभा, मास्क नसल्यास दंड भरावा लागणार
6. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी कार्यालयांमधल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम अनिवार्य, सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती
7. नव्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी विरोधकांचं सरकारला पूर्णपणे सहकार्य, विरोधी पक्षनेते फडणवीसांची ग्वाही, तर राज ठाकरेंचाही पाठिंबा
8. परमबीर सिंहांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय निर्णय सुनावण्याची शक्यता, गेल्या सुनावणीदरम्यान परमबीर सिंहांच्या भूमिकेवरच न्यायालयाचे ताशेरे
9. छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्यात 22 जवान शहीद तर 31 जखमी, नक्षलविरोधी अभियान सुरुच राहणार, मुख्यमंत्री बघेल यांची प्रतिक्रिया
10. पुढचे पाच दिवस तापमानवाढ कायम राहणार, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा इशारा, मात्र मुंबईतला पारा स्थिरावला