Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 मे 2021 मंगळवार | ABP Majha


1. राज्यात सोमवारी 48,621 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 59, 500 रुग्णांना डिस्चार्ज, रुग्णसंख्येत काहीशी घट


2. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत दिवसाला सरासरी 3 हजाराची घट, 12 जिल्ह्यात रुग्णांचा आलेख उतरता तर मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट


3. लसींच्या मागणीसंदर्भातल्या वक्तव्याचा विपर्यास केला, अदर पूनावाल्यांचं स्पष्टीकरण, सरकारसोबत उत्तम समन्वय असल्याचाही दावा


4. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास सीटी स्कॅन करण्याची गरज नाही, आरोग्य मंत्रालयाचा सल्ला, सीटी स्कॅनमुळे कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता


5. नीट-पीजी परीक्षा 4 महिने पुढे ढकलली, एमबीबीएसचे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी तसेच इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोना सेवा करावी लागणार


 



6. साताऱ्यात आजपासून तर बारामतीमध्ये उद्यापासून कडक लॉकडाऊन, वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय, मेडिकल, दूधविक्री सुरु राहणार


7. सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हायकोर्टात, परमबीर सिंह यांच्याकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप


8. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा आज निकाल, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता


9. नागपुरात इंडस पेपर मिलला आग, कोट्यवधीचा माल जळून खाक तर मुलुंडच्या मिनर्वा इंडस्ट्रियल इस्टेटमधील गाळ्यामध्येही अग्नितांडव


10. दोन दशकांहून अधिकच्या वैवाहिक जीवनानंतर बिल गेट्स-मेलिंडा यांच्या नात्याला तडा, बिल ॲंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनमध्ये एकत्रित काम करणार