1. राज ठाकरे ईडीच्या रडारवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, कोहीनूर मिलचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात


 

  1. ईव्हीएमबाबत भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आज पत्रकार परिषद, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार




  1. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं मिशन विधानसभा सुरु तर शिवसेनेसाठी आजपासून बांदेकर भावोजींचा माऊली संवाद


 

  1. राष्ट्रवादी सोडणाऱ्यांचं हृदय तपासावं लागेल, गयारामांना शरद पवारांचा टोला, तर कुरघोड्या थांबल्या नाहीत म्हणून पक्ष सोडल्याचा शिवेंद्रराजेंचा पलटवार


 

  1. शिवसेनेकडून पक्षात येण्यासाठी आतापर्यंत 25 फोन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा


 

  1. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात माझ्या विरोधातील आरोपपत्र अवैध, आरोपी प्रसाद पुरोहितांचा हायकोर्टात दावा


 

  1. राज्यभरात पावसाची संततधार, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडले, हतनूर धरणाच्या 36 दरवाजांमधून विसर्ग सुरु, नाशिक, चंद्रपुरातील धरणांमध्येही पाणीसाठा वाढला


 


8.अयोध्या प्रकरणी आज महत्वाचा निकाल येण्याची शक्यता, नियमित सुनावणीबाबत सुप्रीम कोर्टात निर्णय होणार

  1. बेळगावात देशातील पहिली महिला सैन्य भरती, तीन हजारांपेक्षा जास्त तरुणींचा सहभाग


 

  1. पाकिस्तानच्या ताब्यातील कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळणार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानचा निर्णय