1. नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गजांजी हजेरी
2. एका राजेंचं ठरलं तर दुसऱ्या राजेंमध्ये अजूनही संभ्रम, मेळाव्यानंतरही रामराजे निंबाळकरांचा पक्षांतरासंदर्भात ठोस निर्णय नाही
3. भाजपची महाजनादेश यात्रा आज शरद पवारांच्या बारामतीत, तर पुढील आठवड्यापासून शरद पवारांचाही राज्यभर दौरा
4. शिवसेनेची यादीदेखील मुख्यमंत्रीच ठरवणार, जागावाटपावरून उद्धव ठाकरेंचा उपहासात्मक टोला, आमचं ठरलंय म्हणत युतीवरही अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब
5. आदित्य ठाकरेंनी ग्रामीण महाराष्ट्रातून विधासभा निवडणूक लढवावी, राजकीय चाणक्य प्रशांत किशोरांचा सल्ला, निर्णयाकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष
6. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव शिवसेनेत दाखल, तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या खांद्यावरही भगवा, नालासोपाऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
7. अस्तित्वाची लढाई ठरणारी विधानसभेची निवडणूक लढण्यासंदर्भात मनसे नेत्यांमध्ये दुमत, राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष, पक्षासमोर आव्हानांचा डोंगर
8. मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं मत
9. संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीची झीज सुरुच, पुन्हा एकदा लेपन प्रक्रिया होणार, तर मूळ मुद्द्यांकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष
10. निवड रद्द झालेल्या 118 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती