भिवंडी  : भिवंडी शहरातील नारपोली पोलीस स्टेशन हद्दीतील अंजुर फाटा येथे भिवंडी रेल्वे स्टेशन परिसरातील निर्जन झुडपात एका 25 वर्षीय विवाहितेवर चौघा नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या दिरासह तीन जणांना ताब्यात घेतला आहे .

नारपोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका सोसायटीत 25 वर्षीय विवाहित पीडितेस तिच्या छोट्या दिराने फसवून भिवंडी रेल्वे स्टेशन नजीकच्या निर्जन ठिकाणी आणले. त्या ठिकाणी त्याने आपल्या वहिनीवर बलात्कार केला.  पीडितेने त्यास विरोध करीत असतांना त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाजाने नजीकच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील वावटे पाडा येथील नशा करत बसलेले तीन युवक त्या ठिकाणी आले. त्यांनीही असहाय्य पीडितेवर धमकावून आळीपाळीने बलात्कार केला .

या  दुर्दैवी प्रकारानंतर पीडितेने आपली सोडवणूक करून घेत थेट नारपोली पोलीस ठाणे गाठून आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी तात्काळ अक्षय मांजरे, गोटूराम लबडे यांसह दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयात हजर  केले असता न्यायालयाने त्यांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.