1. बाप्पाच्या निरोपासाठी मुंबई-पुण्यासह नाशकात जय्यत तयारी, नैसर्गिक तलावांसह कृत्रिम तलावांचीही व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, पोलिसांचा फौजफाटा तैनात

2. लालबागच्या राजाच्या मंडपातही विसर्जनाची जोरदार तयारी, कोळी बांधवांचं राजाला साकडं, तर पुण्यात दगडूशेठ गणपतीसमोर केरळी बांधवांचं चंडा वादन

3. महाराष्ट्रात तूर्तास जुन्या आरटीओ नियमांप्रमाणेच दंडवसुली, परिवहनमंत्री दिवाकर रावतेंची माहिती, नितीन गडकरींच्या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीला महाराष्ट्रातच ब्रेक

4. हर्षवर्धन पाटलांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा, मुख्यमंत्र्यांकडून इंदापूरच्या उमेदवारीचे संकेत, तर 48 नगरसेवकांसह गणेश नाईकांचाही भाजपमध्ये प्रवेश

5. ईडीची चौकशी झाल्यापासून राज ठाकरे बोलायचे कमी झाले, बारामतीतल्या कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य



6. बुलडाण्यात पैनगंगेला पूर, येळगाव धरण ओव्हरफ्लो, तर नागपूर जिल्ह्यातलं तोतलाडोह धरण 94 टक्के भरलं

7. साताऱ्यात पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, सर्व प्रवासी कर्नाटकातले असल्याची माहिती

8. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्याला दंड भरला नाही म्हणून मारहाण, मुंबई पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे हायकोर्टाचे निर्देश

9. ओम आणि गाय शब्द उच्चारताच विरोधकांचे कान टवकारतात, मथुरेतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

10. ऐन मोहरममध्ये पाकिस्तानात पेट्रोलपेक्षा दूध महाग, 1 लिटर दुधासाठी 140 रुपये मोजावे लागत आहेत