ABP Majha Mahakatta LIVE Updates : एबीपी माझाचा 'महाकट्टा'; कट्टा नात्यांचा, सोहळा संवादाचा, पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

ABP Majha Mahakatta LIVE Updates : एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाकट्ट्याचं आयोजन केलंय. या कार्यक्रमात दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 May 2023 01:46 PM
Sanjay Raut : काहीही झालं तरी झुकायचं नाही हे ठरवलेलं, संजय राऊतांनी सांगितला ईडीच्या अटकेनंतरचा अनुभव

Sanjay Raut : ईडीने (ED) मला जेव्हा अटक केली तेव्हा मी घरच्यांचे चेहरे पाहत होतो. ज्यावेळी मला आर्थर रोड जेलमध्ये नेलं त्यावेळी आमदार सुनिल राऊत (Sunil Raut) यांना हुंदका फुटल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. काहीही झालं तरी झुकायचे नाही असं आमच्या घरी ठरलं होतं. प्रतिमेला धक्का लागेल असे कोणतही कृत्य करायचे नाही असं ठरवल्याचे संजय राऊत म्हणाले. मला खात्री आणि विश्वास होता की मी लवकर बाहेर येईल असे राऊत म्हणाले. ईडीच्या कोणत्याही कारवाईत अटक झालेला तीन महिन्यात बाहेर आलेला मी एकमेव माणूस असल्याचे राऊत म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाकट्ट्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात संजय राऊत आणि सुनिल राऊत या दोन बंधुंशी संवाद साधण्यात आला त्यावेळई त्यांनी विविध मुद्दे मांडले. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Shankar Mahadevan On ABP Majha Majha Mahakatta : शंकर महादेवन यांनी शेअर केला 'कट्यार'चा अनुभव

Shankar Mahadevan On ABP Majha Majha Mahakatta : कट्यारच्या अनुभवाबद्दल बोलताना शंकर म्हणाले,"जेव्हा सुबोध भावेने मला भेटून कट्यार काळजात घुसली या प्रोजेक्टची माहिती दिली. त्यावर मी म्हणालेलो,"एक ताजमहाल आधीपासूनच आहे. आता त्याच्या बाजूला आणखी एक ताजमहाल बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. आमच्यात खूप चर्चा झाली आणि मी या सिनेमासाठी होकार दिला. सूर निरागस हो हे पहिलं गाणं मी रेकॉर्ड केलं. पुढे या सिनेमातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. हा सिनेमा करण्यासाठी सुबोधने खूप मदत केली. 

Shankar Mahadevan On ABP Majha Majha Mahakatta : शंकर महादेवन खळे काकांकडून काय शिकले?

Shankar Mahadevan On ABP Majha Majha Mahakatta : एबीपी माझाच्या माझा महाकट्टा या कार्यक्रमात खळे काकांबद्दल बोलताना शंकर महादेवन म्हणाले की,"आयुष्यात काय नाही करायचं हे मी खळे काकांकडून शिकलो आहे". 

Shankar Mahadevan On ABP Majha Majha Mahakatta : माझ्या दोन्ही मुलांसोबत स्क्रीन शेअर करू शकतो, याचा मला अभिमान आहे : शंकर महादेवन

Shankar Mahadevan On ABP Majha Majha Mahakatta :  शंकर महादेवन म्हणाले, सिद्धार्थला लहानपणापासूनच तालाचं खूप ज्ञान होतं. मुलांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांना त्या क्षेत्रात काम करण्याची मुभा होती. पण त्यांना संगीताची ओढ लागली. आज मी माझ्या दोन्ही मुलांसोबत स्क्रीन शेअर करू शकतो, याचा मला अभिमान आहे. 

Raj Thackeray on ABP Majha Mahakatta: मी टॉवेलविना सुकलो होतो, राज ठाकरेंनी सांगितला दहावीच्या निकालाचा 'तो' किस्सा

ABP Majha Mahakatta Raj Thackeray: राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे माझा महाकट्ट्यावर लाईव्ह आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या बालपणीचे अनेक भन्नाट किस्से सांगितलेत. राज ठाकरेंनी त्यांच्या दहावीच्या रिझल्टचा किस्सा सांगितला. तो पाहुयात... 


पाहा व्हिडीओ : Raj Thackeray SSC Marks : मी टॉवेलविना सुकलो होतो, राज ठाकरेंनी सांगितला दहावीच्या निकालाचा किस्सा


ABP Majha Mahakatta LIVE: मला दहावीत बाळासाहेबांनी सांगितलं होतं...फक्त पास हो : राज ठाकरे

ABP Majha Mahakatta LIVE: एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त एबीपी माझाने महाकट्ट्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यातील पहिला संवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांच्याशी साधला. यावेळी राज ठाकरे आणि कुंदाताई ठाकरे यांनी दिलखुलास संवाद साधला. 


पाहा व्हिडीओ : Raj-Madhuwanti Thackeray : मला दहावीत बाळासाहेबांनी सांगितलं होतं...फक्त पास हो ABP Majha


ABP Majha Mahakatta LIVE Updates : एबीपी माझा महाकट्टा; राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांच्यासोबत रंगला 'महाकट्टा'

ABP Majha Mahakatta LIVE Updates : अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे.. त्यांच्या राजकीय मुलाखती अनेक आहेत. पण राज ठाकरे लहान असताना कसे होते? त्यांच्या शालेय जीवनातले किस्से, कॉलेजमध्ये असताना केलेल्या करमाती, अशी सगळी गुपितं आज उघड होणार आहेत. आणि ही सर्व गुपितं सांगणार आहेत, त्यांची जन्मदात्री आई, कुंदाताई ठाकरे.. राज यांच्या आई पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत.. राज ठाकरे आणि त्यांच्या आईसोबत त्यांच्याच घरी एबीपी माझाचा महाकट्टा रंगला.


पाहा व्हिडीओ : Madhuwanti Thackeray : राजनं आतासारखा अभ्यास शाळेत केला असता तर कुठल्याकुठे गेला असता


ABP Majha Mahakatta LIVE : एबीपी माझाचा महाकट्टा, दिवसभर एबीपी माझावर लाईव्ह

ABP Majha Mahakatta LIVE Updates :  आज एबीपी माझाचा कट्टा झालाय अकरा वर्षांचा. हा प्रवास सोपा नव्हता. तो केवळ तुमच्या साथीनं शक्य झाला आहे. आज एबीपी माझाचा महाकट्टा पार पडणार आहे. एबीपी माझावर दिवसभर तुम्हाला महाकट्टा लाईव्ह पाहता येणार आहे. एबीपी माझावर दिवसभर अनेक मान्यवरांची मांदियाळी असणार आहे.



पार्श्वभूमी

ABP Majha Mahakatta LIVE Updates :  आज एबीपी माझाचा कट्टा झालाय अकरा वर्षांचा. हा प्रवास सोपा नव्हता. तो केवळ तुमच्या साथीनं शक्य झाला आहे. आज एबीपी माझाचा महाकट्टा पार पडणार आहे. एबीपी माझावर दिवसभर तुम्हाला महाकट्टा लाईव्ह पाहता येणार आहे. एबीपी माझावर दिवसभर अनेक मान्यवरांची मांदियाळी असणार आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे कट्ट्यावर लाईव्ह 


अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे.. त्यांच्या राजकीय मुलाखती अनेक आहेत. पण राज ठाकरे लहान असताना कसे होते? त्यांच्या शालेय जीवनातले किस्से, कॉलेजमध्ये असताना केलेल्या करमाती, अशी सगळी गुपितं आज उघड होणार आहेत. आणि ही सर्व गुपितं सांगणार आहेत, त्यांची जन्मदात्री आई, कुंदाताई ठाकरे.. राज यांच्या आई पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत.. राज ठाकरे आणि त्यांच्या आईसोबत त्यांच्याच घरी एबीपी माझाचा महाकट्टा रंगला.. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.